Winter Update
शेतकरी मित्रांनो, रब्बीची पिके सध्या जोमात आहेत, पण तुमच्या मनात एकच धाकधूक असते ती म्हणजे अवकाळी पाऊस आणि गारपिटीची! पण आता जी बातमी समोर आली आहे, ती वाचून तुम्ही सुटकेचा निश्वास टाकाल. पुढच्या तीन महिन्यात नेमकं काय वाढून ठेवलंय? वाचा सविस्तर…

आताची सर्वात मोठी हवामान अपडेट (Winter Update)
भारतीय हवामान विभागाने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांचा अंदाज (Long Range Forecast) स्पष्ट केला आहे. यात काही गोष्टी तुमच्यासाठी खूप फायद्याच्या आहेत:
- पावसाची शक्यता नाही: जानेवारी ते मार्च या काळात महाराष्ट्रात पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे. जेव्हा पाऊसच नसेल, तेव्हा पिकांचे नुकसान होण्याचा प्रश्नच येत नाही.
- गारपिटीचे संकट टळले: गारपीट होण्यासाठी आकाशात ढग जमणे आणि पाऊस होणे गरजेचे असते. पण या काळात पावसाची सिस्टिमच बनत नाहीये, त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये गारपिटीची शक्यता जवळपास नाहीच, असे समजा.
- अपवाद फक्त दक्षिण महाराष्ट्र: लातूर, उस्मानाबाद (धाराशिव), नांदेड, परभणीचा काही भाग आणि सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यात अत्यंत किरकोळ (१ ते दीड सेंटीमीटर) पावसाचा अंदाज आहे, जो पिकांसाठी घातक नाही.
- थंडीचा मुक्काम वाढला: यावर्षी ‘ला-निना’ (La Niña) प्रभाव असल्याने थंडीचा कडाका जास्त दिवस टिकणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्हाला थंडीच्या लाटा जाणवतील.
आता शेतकऱ्यांनी काय करावे?
शेतकरी दादांनो, ही परिस्थिती आपल्या रब्बी पिकांसाठी खूप “पॉझिटिव्ह” आहे.
१. गहू आणि हरभऱ्यासाठी पोषक: थंडीचा कालावधी वाढल्यामुळे गहू आणि हरभरा पिकाला मोठा फायदा होणार आहे. दाणे भरण्याच्या अवस्थेत थंडी मिळाल्याने उत्पादन वाढेल.
२. संक्रांतीनंतरही हुडहुडी कायम: मकर संक्रांतीनंतर (१४ जानेवारी) थंडी जाईल असा तुमचा समज असेल, तर तो चुकीचा आहे. १५ जानेवारीनंतरही थंडीच्या लाटा येत राहतील.
३. विदर्भ-खानदेशात जास्त थंडी: झारखंड, छत्तीसगड आणि बिहारमध्ये कडाक्याची थंडी असल्याने त्याचा थेट वारं विदर्भ (नागपूर, गोंदिया) आणि खानदेशाकडे येत आहे. त्यामुळे तिथे पारा अजून खाली जाऊ शकतो.
४. पाण्याची नियोजन करा: पाऊस सरासरीपेक्षा कमी असल्याने, उन्हाळी पिकांसाठी आतापासूनच पाण्याचे काटेकोर नियोजन करा. विहिरींच्या पाणी पातळीवर लक्ष ठेवा.
निष्कर्ष
थोडक्यात सांगायचं तर, निसर्ग यावेळी शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. गारपिटीचा धोका नाही, आणि थंडी पिकाला पोषक आहे. त्यामुळे मनातील भीती काढून टाका आणि रब्बीच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करा.
शेतकरी मित्रांनो, थंडी वाढल्यामुळे तुमच्या भागातील गव्हाचे पीक कसे आहे? कमेंट करून नक्की सांगा.