Electricity Bill Waive : राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४” लागू केली आहे. या योजनेअंतर्गत ७.५ अश्वशक्ती (एच.पी.) क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांना मोफत वीजपुरवठा केला जाणार आहे. जिल्ह्यातील ४ लाख १ हजार ६७५ शेतीपंपधारकांपैकी ३ लाख ७८ हजार ८६६ शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ | वीजबिल माफीची रक्कम | Electricity Bill Waive
जून २०२४ च्या वीज बिलानुसार या शेतकऱ्यांना २९७ कोटी रुपयांचे वीजबिल माफ करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांनी दिली. जागतिक हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अनियमित पावसाचा सामना करावा लागत आहे. तसेच, वेळेवर वीज मिळाली नाही तर सिंचनाची समस्या निर्माण होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंतच्या शेतीपंपांसाठी मोफत वीज योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना २०२४ | वीज वापर आणि कृषी क्षेत्र | Electricity Bill Waive
महावितरणच्या एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के ग्राहक हे कृषीपंप वापरतात, आणि राज्यातील एकूण विजेच्या ३० टक्के ऊर्जेचा वापर शेतीसाठी केला जातो. सध्याचा कृषी क्षेत्रातील वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दश लक्ष युनिट आहे. मुख्यतः ही वीज कृषीपंपांसाठी वापरली जाते.
वीजपुरवठा आणि वितरण | Electricity Bill Waive
महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, कृषीपंपांना रात्री ८ ते १० तास, किंवा दिवसा ८ तास थ्री-फेज विजेचा पुरवठा केला जातो. ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ महावितरण कंपनीद्वारे राबवली जाणार आहे. वीजबिल माफ केल्यानंतर अनुदानित वीज दरानुसार रक्कम शासन महावितरण कंपनीला अग्रीम स्वरूपात वर्ग करणार आहे.
योजनेचा कालावधी आणि आढावा | Electricity Bill Waive
ही योजना पाच वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे. मात्र, तीन वर्षांच्या कालावधीत योजनेचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. ७.५ एच.पी. क्षमतेपर्यंत शेतीपंपाचा मंजूर भार असलेले सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील.
या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळेल, आणि शेतीसाठी आवश्यक असलेली वीज मोफत उपलब्ध करून दिली जाईल, ज्यामुळे सिंचनासंबंधी समस्या सोडविण्यात मदत होईल.