Monsoon Update : पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागांतून मॉन्सून परतीच्या प्रवासाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मॉन्सूनच्या परतीसाठी आवश्यक हवामान आता पोषक बनू लागले आहे, आणि सोमवारी (ता. २३) या क्षेत्रातून मॉन्सून हलविण्याचे संकेत आहेत.
वायव्य भारतात सलग पाच दिवस पावसाने उघडीप दिली आहे. आर्द्रतेची टक्केवारी कमी झाल्यामुळे कोरडे हवामान निर्माण झाले आहे. यासोबतच वाऱ्यांची दिशा बदलून, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वारे वाहणारी क्षेत्रे (अॅण्टी सायक्लोन) तयार होणे आवश्यक आहे. यामुळे या भागातून मॉन्सूनच्या परतण्याबाबत अधिकृत जाहीरात होईल.
दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेनुसार, १७ सप्टेंबर ही मॉन्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची अपेक्षित तारीख आहे. गतवर्षी, २५ सप्टेंबर रोजी राजस्थान आणि गुजरातमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
वायव्य भारतात मॉन्सूनच्या परतीसाठी आवश्यक हवामान तयार होत आहे, ज्यामुळे कोरडे हवामान आणि बाष्पाचे प्रमाण कमी होण्याचे संकेत मिळत आहेत. यामुळे, येत्या काळात मॉन्सूनच्या परतीचा प्रवास हळूहळू सुरू होईल.