
India Meteorological Department : ऑगस्ट 2023 महिना लागल्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली होती. परंतू आज राज्यातील विदर्भ या भागात मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच हवामान खात्याने विदर्भ या भागात येलो अर्लट जारी केला आहे.
India Meteorological Department | भारतीय हवामान विभाग
दरवर्षी ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होत असतो परंतू यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने मोठी दडी मारली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, संपूर्ण देश भरात पावसाचा जोर हा कमी होणार आहे. तसेच अनेक राज्यात पाऊस दडी मारणार आहे. राज्यातील तूरळक भाग सोडला तर उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, आज राज्यातील विदर्भात मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार तसेच विदर्भातील उर्वरित भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाडा, खान्देश, विदर्भ तसेच कोकण भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस होत राहणार आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, आज रात्री परभणी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भात आज बहूतांश भागात पावसाच्या सरी बरसणार आहेत. नागपूर आणि अहमदनगर मध्ये पावसाची सुरुवात झाली आहे.. पुढील काही तासात अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार तसेच १९ ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आणि हा पाऊस सर्वदूर होत राहणार आहे. आज रात्री मराठवाड्यात तूरळक ठिकाणी वीजासह मुसळधार पाऊस होणार तसेच बहूतांश भागात पावसाच्या सरी बरसणार आहेत.