IMD : विदर्भात आणि मराठवाड्यातील बहूतांश जिल्ह्यात अजूनहि दडी मारलेली आहे. परंतू हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाची सुरुवात झाली आहे. तसेच पुढील दोन दिवसात राज्यात बहूतांश भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसाचे आगमन हे उशीरा झाले आहे. परंतू अजूनहि महाराष्ट्रात अनेक भागात पुरेसा पाऊस पडला नाही. १८ ऑगस्ट पासून तूरळक ठिकाणी पावसाचे आगमन झाले आहे. पुढील काही तासात महाराष्ट्रातील विदर्भात पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
देशात हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश मध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. हवामान खात्यानुसार, विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची सुरुवात झाली आहे. येणाऱ्या काही तासात वातावरणात बदल होऊन पावसाचा जोर वाढणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात बदल झाल्यामुळे तेथे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा उत्तर प्रदेशकडे सरकत असल्यामुळे याचा परिणाम महाराष्ट्रावर होणार आहे.
भारतीय हवामान खात्यानुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस होत राहणार आहे. परंतू प्रादेशिक हवामान खात्यानुसार, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील विदर्भात आज पासून पावसाची सुरुवात होईल. तसेच पुढील काही मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि कोकण भागात मध्यम ते हलक्या प्रकाराचा पाऊस पडत राहणार आहे.