Advance Crop Insurance : मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्यात गेल्या ७२ तासात ५० कोटीहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेली आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे ५० टक्के पेक्षा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. हे चित्र पाहता अभिजित राऊत जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढत शेतकऱ्यांनसाठी २५ टक्के अग्रिम पिक विमा मंजूर केला आहे.
गेल्या काही दिवसापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ५० कोटीहून अधिक रक्कम गेल्या दोन दिवसात जमा करण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात जुलै महिन्यात अति मुसळधार पाऊस तर ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले. बहूतांश शेतकऱ्यांना यावर्षी निम्याहून जास्त उत्पादन कमी झाले आहे.याबाबत प्रशासनाने दखल घेतली तसेच शासनाने प्रशासनाला अधिसूचना काढण्याचे आदेश दिले होते
पहिल्या टप्यात तीस कोटी, दुसऱ्या टप्यात वीस कोटी असे मिळून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात पन्नास कोटी रुपये जमा करण्यात आले आहे.