Electric Vehicles In Pune : पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्यासाठी पुणे महानगरपालिकाने मोठ निर्णय घेतला आहे. पुणे शहरात प्रदूषण कमी करण्यासाठी ई वाहनांना चालना मिळेल.
पुणे महानगरपालिकेने चांगला निर्णय घेतला आहे. परंतू हा फायदा फक्त महानगरपालिकेतील रिक्षा चालकांना तसेच रिक्षा व्यावसायीक लोकांना होणार आहे. यामुळे रिक्षाधारक लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारेल तसेच उत्पादनात वाढ होईल.
पुणे मध्ये वायू प्रदूषण हि एक मोठी समस्या बनली आहे. वायू प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने वारंवार प्रयत्न केले आहेत. सध्याच्या परिस्थितीत पुणे शहरात ९१ हजार हून अधिक रिक्षा सीएनजीवर आहेत. सर्वात महत्वाचे अगोदर रिक्षा चालकांना १२ हजार पर्यंत अनुदान देण्यात येत होते.
पुणे महानगरपालिका तेथील रहिवाशी रिक्षा चालकांना दुप्पट अनुदान देणार आहे. प्रथम १२ हजार रुपये मिळत होते परंतू हि आता २५ हजार रूपये पर्यंत अनुदान गेले आहे. यामुळे electric vehicles अधिक प्रध्यान राहिल.
पुणे महानगरपालिकेत रिक्षा चालक रहिवाशी राहत असेल आणि त्याने नवीन ई रिक्षा चालवण्यासाठी घेतली तर त्यास २५ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. हि योजना लागू करण्यासाठी पुणे महानगर पालिकाला मोठा खर्च करावा लागणार आहे.
२०१८ वर्षी रिक्षा चालकांना १२ हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते होते. परंतू प्रशासनाने अनुदान पुढील काही कालावधीसाठी बंद केले होते. राज्य शासनाच्या मते, पुणे शहरात दिवसांन दिवस प्रदूषण वाढत आहे. यामुळे राज्य शासन ई वाहनांना प्रोत्याहान देणार आहे. यामुळे पुणे महानगरपालिका रहिवासी ई रिक्षा चालकांना २५ हजार पर्यंत अनुदान देणार आहे.
हि योजना नवीन ई रिक्षा चालकांना मिळणार आहे. या मध्ये ई रिक्षा चालकांना, आपघात विमा, मुलांना आर्थिक मदत, आरोग्य विमा तसेच कर्ज आणि पेन्श्नचा लाभ सुध्दा मिळणार आहे.