Gas Cylinder : उज्ज्वला योजनेअंतर्गत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १० कोटी गरीब कुटूबांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. मोदी सरकारने गॅस सिंलिडर सबसिडी मध्ये २०० रुपये ऐवजी ३०० पर्यंत वाढ केल्या मुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत तब्बल १० कोटी कुटूबांना ६०० रुपये पर्यंत गॅस सिलिडर मिळणार आहे. यामुळे गरिब लोकांना आर्थिक आधार मिळणार आहे. ऐवढेच नव्हे तर मागील काही दिवसापूवी ग्राहकांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने २९ ऑगस्ट रोजी गॅस सिंलिडरचे दर कमी करण्यात आले होते.
Farming Insurance : शेतकऱ्यांना पिक विमा मिळणार का ?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गॅस सिलिडर ( Gas Cylinder ) सबसिडीचे दर ३०० रुपये पर्यंत वाढवल्या नंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ७०० किंवा ६०० रुपये पर्यंत गॅस सिलिडर मिळणार आहे. जवळपास यामध्ये ४०० रुपयाची कपात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन उज्ज्वला योजनेअंतर्गत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत महिलांना ७५ लाख एलपीजी गॅस सिलिंडरसाठी मान्यता देण्यात आली आहे. पुढील तीन वर्षात ७५ लाख कनेक्शन जोडण्यासाठी तब्बल १६५० कोटी पर्यंत खर्च करावा लागणार आहे.