
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र सरकारची ‘लाडकी बहीण’ योजना राज्यातील महिलांसाठी अतिशय लोकप्रिय ठरली आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा करण्यात येत होते, ज्याचा थेट फायदा हजारो महिलांना झाला. निवडणुकीच्या काळात महायुतीने सत्तेत आल्यास महिलांना या योजनेत वाढ करून २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता सत्ताधारी महायुती सरकारच्या धोरणांमुळे महिलांमध्ये ही रक्कम वाढणार की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.
निवडणुकीतील महत्त्वाची भूमिका | Ladki Bahin Yojana
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांमध्ये सरकारबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली, आणि याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर दिसून आला. विधानसभेच्या आचारसंहितेमुळे काही काळासाठी ही योजना स्थगित करण्यात आली होती. मात्र, आता महायुती पुन्हा सत्तेत आल्याने महिलांनी आपल्या खात्यावर वाढीव रक्कम जमा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
सरकारने नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू केली नाही, त्यामुळे उर्वरित लाभार्थींनीही नव्या घोषणेची प्रतीक्षा सुरू केली आहे. ऑक्टोबर २०२४ पर्यंत नोंदणी झालेल्या महिलांना नियमित लाभ मिळत आहेत. मात्र, वाढीव २१०० रुपयांच्या वचनाची अंमलबजावणी होणार की नाही, याबद्दल अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
अमरावती जिल्ह्यातील योजनेची स्थिती
अमरावती जिल्ह्यातील या योजनेतून तब्बल ८ लाख महिलांना लाभ मिळाला आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्यांमध्ये लाभार्थींची संख्या खालीलप्रमाणे आहे:
अमरावती: १,७८,२७६
भातकुली: २६,९५०
धारणी: ५०,१६३
चांदूरबाजार: ४६,३२६
अंजनगाव: ४०,८८१
धामणगाव: ३२,५९९
नांदगावखंडे: ३२,५९९
दर्यापूर: ४३,३२९
अचलपूर: ६९,४४५
चिखलदरा: ३१,४२०
तिवसा: २७,२८८
चांदूररेल्वे: २२,६९४
मोर्शी: ४६,२६९
वरुड: ५५,५७५
महिलांच्या अपेक्षा आणि नव्या घोषणेची प्रतीक्षा
राज्यभरातील महिलांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. मात्र, महिलांच्या खात्यात वाढीव २१०० रुपये जमा होणार की जुन्याच निकषांवर योजना सुरू राहणार, याबद्दल अनिश्चितता आहे.
सरकारकडून योजनेबाबत नवीन घोषणा केल्यास अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे. नव्या नोंदणी प्रक्रियेसह वाढीव रक्कम लागू झाल्यास महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने मोठा आधार मिळू शकेल.
सरकारने या योजनेबद्दल लवकरात लवकर निर्णय घेऊन महिलांना दिलेला शब्द पूर्ण करावा, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.
