
Pik Vima : राज्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, खरीप हंगाम मध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहयला मिळाले. त्यामुळे शेतकरी आर्थिक कर्जात सापडले. २०२२ मध्ये पीक विमा संदर्भात विमा कंपनीने निर्णयाचा विरोध करत थेट समितीला अर्ज केला होता. यांनतर आता समितीने हा कंपनीचा अर्ज फेटाळला आहे. यामुळे महाराष्ट्रातील आनंद झाला आहे. हजारो शेतकऱ्यांनी या पासून लाभ होणार आहे.
पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांना आधार
सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या माहितीनुसार, २०२२ मधील खरीप हंगामासाठी अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा (Pik Vima) भरला होता. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहयला मिळाले. शेतकऱ्यांनी या नुकसानीबाबत विमा कंपनीकडे तक्रारी केली होती. परंतु सुरुवातीला विमा कंपनीने नुकसानभरपाई देण्याचे टाळले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्हास्तरीय समितीकडे आपले दु:ख किंवा मत व्यक्त केले. त्यानंतर शेतकऱ्यांना हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
विमा कंपनीचा अर्ज
जिल्हास्तरीय समितीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले होते. या नंणियाचा विरोध करत विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अर्ज केला होता. जिल्हास्तरीय समितीचा निर्णय ठाम होता.
भारतीय कृषी विमा कंपनीने अर्ज केल्यानंतर १७ तारखेला मंत्रालयात याची सुनावणी पूर्ण केली. या मध्ये विमा कंपनीचे अर्ज फेटाळले आणि तातडीने नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा असे आदेश देण्यात आले आहे.
तुम्हाला या बाबत काय वाटते नक्कीच आम्हाला कमेंट करुन सांगा
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट | महिलांना मोठ्या प्रमाणत लाभ