PM Kisan Sanman Nidhi : या जिल्ह्यात 800 कोटींचे अनुदान वाटप

PM Kisan Sanman Nidhi : या जिल्ह्यात 800 कोटींचे अनुदान वाटप
PM Kisan Sanman Nidhi : या जिल्ह्यात 800 कोटींचे अनुदान वाटप

 

PM Kisan Sanman Nidhi : परभणी जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पी.एम. किसान) अंतर्गत १ ते १५ हप्त्यांचा मिळून एकूण ४ लाख २ हजार ६६१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. एकूण ८०० कोटी ४५ लाख रुपये एवढी रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (पी.एम. किसान) अंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर दर चार महिन्यांनी २ हजार रुपये असे मिळून वर्षभरात एकूण ६ हजार रुपये एवढे अनुदान जमा केले जाते. या अंतर्गत अपात्र असलेल्या शेतकऱ्यांची नावे लाभार्थीच्या यादीतून वगळण्यात आली आहेत.

अनेक अपात्र शेतकऱ्यांकडून अनुदानाची रक्कम परत घेण्यात आली. ईकेवायसी न केल्यामुळे तसेच जमीन संलग्न नसल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या योजनेअंतर्गत अनुदान वाटपाच्या १ ते १५ हप्त्यापर्यंत जिल्ह्यातील ४ लाख २ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या खात्यावर ८०० कोटी ४५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.

या योजनेच्या पहिल्या हप्त्याचे जिल्ह्यातील ३ लाख १८ हजार ३१९ शेतकरी लाभार्थी असून ६३ कोटी ६६ लाख रुपये अनुदानाची रक्कम आहे. त्यानंतर तिसरा हप्ता वगळता इतर हप्त्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी होत गेली आहे. १५ वा हप्त्याचे ८१ हजार ६८९ शेतकरी लाभार्थी असून अनुदानाची रक्कम १६ कोटी ३३ लाख रुपये आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

PM Kisan KYC : 6 हजार 329 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित
PM Kisan KYC : 6 हजार 329 लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित

 

PM Kisan : 15 जूनपर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम
PM Kisan : 15 जूनपर्यंत राज्यभर नोंदणी मोहीम
Categories NEW

Leave a Comment