Polyhouse Subsidy : सर्व शेतकऱ्यांना 1 कोटी पर्यंत फळबागासाठी ८० लाख पर्यंत अनुदान

Polyhouse Subsidy : सर्व शेतकऱ्यांना 1 कोटी पर्यंत फळबागासाठी ८० लाख पर्यंत अनुदान
Polyhouse Subsidy : सर्व शेतकऱ्यांना 1 कोटी पर्यंत फळबागासाठी ८० लाख पर्यंत अनुदान
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Polyhouse Subsidy : आपण एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत ते म्हणजे हरितगृह अनुदान आणि त्यासोबतच फळबाग लागवड योजनेसाठीच दिलं जाणार अनुदान आता हे अपडेट काय आहे. तर आधुनिक शेती प्रकल्पांच्या योजनांमधील अनुदानाच्या मर्यादा केंद्र सरकारने वाढवलेल्या आहेत. त्यामुळे आता हरितगृह उभारणीसाठी १ कोटी रुपयांपर्यंत तर फळबाग लागवडीसाठी कमाल अनुदान 80 लाख रुपयांपर्यंत मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

शेतकऱ्यांना 1 कोटी पर्यंत अनुदान | Polyhouse Subsidy

केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे सहसचिव प्रियरंजन यांनी अलीकडेच, राज्याच्या कृषी विभागाला पाठवलेल्या पत्रात ही माहिती दिली आहे. केंद्र सरकारने देशात 2014-15 मध्ये एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान लागू केलं होतं, मात्र या अभियानात गृहीत धरण्यात आलेल्या खर्चाच्या मर्यादा वाढवण्यात आल्या नव्हत्या, महागाईमुळे शेती प्रकल्पातील कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या असताना, अनुदान मात्र पुरेस मिळत नव्हतं. त्यामुळे तब्बल दहा वर्षानंतर आता खर्च मर्यादा वाढवण्यात आली असून त्यामुळे कमाल अनुदानातही वाढ झालेली आहे.

शेतीमधील निविष्टा अत्यावश्यक सामग्री यंत्र आणि अवजार तसंच तंत्रज्ञान खर्चात गेल्या दहा वर्षांमध्ये वाढ झाली आहेत. त्यानुसार एकात्मिक फल उत्पादन विकास अभियानातून चालू असलेल्या प्रकल्पांमध्ये शेतकऱ्यांनाही अनुदान वाढवून मिळायला हवं अशी भूमिका कृषी मंत्रालयाने घेतली. त्यामुळे सुधारित निकष लागू करण्यात आलेत असं केंद्रीय कृषी सह सचिवांनी स्पष्ट केलंय.

केंद्राने निकष बदलल्यामुळे आता राज्याच्या कृषी विभागाकडून संरक्षित शेतीसह फळबागा आणि औषधी वनस्पती पिकांसह फल उत्पादनाशी संबंधित सर्व योजना तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेतील अनुदानाच्या रकमा वाढवल्या जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, तसेच फल उत्पादनाशी संबंधित विविध मंडळ व राज्यस्तरीय संस्थांकडून अनुदान वाटताना एमआयडीएच चे निकष गृहीत धरले जातात.

जुन्या निकषानुसार हरितगृहाचा कमाल खर्च एक कोटी बारा लाख रुपये गृहीत धरीत 50 टक्के अनुदानानुसार कमाल 56 लाख रुपये अनुदान देय होतं. आता नवीन निकषानुसार केंद्र सरकार हरितगृहाचा प्रकल्प खर्च दोन कोटी रुपये गृहीत धरणारे आणि त्यामुळे आता 50 टक्के मर्यादेनुसार कमाल एक कोटी रुपयांपर्यंत अनुदान लाभार्थ्यांना मिळणार आहे. मात्र हरितगृहासाठी अनुदान मिळवण्यासाठी प्रकल्प किमान 2500 चौरस मीटर क्षेत्राचा असणं बंधनकारक असणार आहे.

फळबागासाठी ८० लाख पर्यंत अनुदान

फळबाग लागवडीचा कमाल प्रकल्प खर्च आता 75 लाखांवरून एक कोटी रुपयांपर्यंत गृहीत धरण्यात आलाय त्यात शेतकऱ्याला प्रकल्प खर्चाच्या 40% अनुदान मिळतं, त्यामुळे सुधारित निकषानुसार शेतकऱ्यांना 30 लाख लाखांऐवजीत 40 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकणार आहे. परंतु फळबाग लागवडीचा छोटा प्रकल्प दोन हेक्टर वरील असावा आणि त्यासाठी कमाल 40 लाखांपर्यंत अनुदान मिळणार आहे. तर मोठा प्रकल्प 20 हेक्टर पेक्षा कमी नसावा फळबागांच्या मोठ्या प्रकल्पासाठी कमाल 80 लाखांपर्यंत अनुदान मिळू शकेल असं सूत्रांचं म्हणणं आहे. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमची जी काही सविस्तर प्रतिक्रिया आहे, ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा.

Kisan Credit Card Benefits : किसान क्रेडिट कार्ड चे फायदे

Ladki Bahin Yojana Update News : लाडकी बहिण योजनेअंतर्गत किती कोटी वाया गेले ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories NEW

७ वर्षांचा अनुभव असलेले कृषी क्षेत्रातील जाणकार. शेतीविषयी माहिती, तांत्रिक उपाय, सरकारी योजना, आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या बातम्या वेळेवर पुरवणारे, कृषी विषयक बातम्या, सरकारी योजना, पीक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आधारित शेती उपाय. Follow the आपला बळीराजा channel on WhatsApp: https:// whatsapp.com /channel/0029 VaVXDW51dAw BKLGyfQ3F

Sharing Is Caring:

Leave a Comment