Rain Update : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज (9 जानेवारी 2024) पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बीड, नाशिक, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, अमरावती. मध्य महाराष्ट्र, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हवेचे तापमान 15 ते 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
लक्षद्वीप बेटांजवळ आलेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता बळावली आहे. आज (दि. 9) मध्य महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नगरमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिसरात ढगाळ वातावरण असेल आणि हवेचे तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे,