Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | तूरीचे भाव वाढणार ?

Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | तूरीचे भाव वाढणार ?
Tur Market : तूर उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी | तूरीचे भाव वाढणार ?
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tur Market : सध्या बाजारात तुरीला हमीभावापेक्षा कमी दर मिळतोय, बाजारात तुरीची आवक वाढल्यानंतर दरावर आणखीन दबाव येण्याची शक्यता आहे. परंतु यंदा तुरीला हमीभावाचा आधार असणार आहे कारण सरकारने संपूर्ण तूर खरेदीचा आश्वासन दिलंय तर बाजारामधली तुरीची आवक कमी झाल्यानंतर तुरीचा बाजारात चांगली सुधारणा होऊ शकते. आवक एकदम कमी झाल्यानंतर तुरीचा बाजार साडे आठ ते नऊ हजार रुपयांच्या दरम्यान देखील पोहोचू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय. थोडक्यात काय तर यंदा तुरीला किमान हमीभावाचा आधार आहे.

तूरीचे उत्पादन वाढले | Tur Rate

शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळून सरकारला किमान तूर विक्रीचे नियोजन करावं, जेणेकरून किमान हमीभाव तरी पदरामध्ये पडेल आणि जे शेतकरी थांबू शकतात. त्यांनी चांगल्या दरवाढीच्या अपेक्षेने थांबायला यंदा हरकत नाही, असं देखील आव्हान अभ्यासकांनी केलंय. परंतु हे करताना बाजारामधल्या बदलत्या परिस्थितीचा देखील दरावरती परिणाम होऊ शकतो हे देखील लक्षात ठेवावं असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता यंदा देशामध्ये तुरीची लागवड जवळपास 14% वाढली होती. त्यामुळे साहजिकच यंदा गेल्या वर्षी पेक्षा उत्पादन वाढणार आहे.

सरकारने पहिल्या अंदाजात यंदा 35 लाख टनांवर उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केलाय. परंतु सरकार कदाचित दुसऱ्या अंदाजामध्ये उत्पादन 38 ते 39 लाख टनांच्या दरम्यान होईल, असा अंदाज व्यक्त करू शकतं असं देखील सांगितलं जातंय आता गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. त्यातल्या त्यात 2024 मध्ये तुरीची आयात जवळपास 12 लाख टन झाली होती. म्हणजेच आयातीने देखील विक्रम केला होता. त्यामुळे साहजिकच बाजारामध्ये अशी चर्चा आहे, की यंदा उत्पादन वाढणार आहे. आयात देखील मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यंदा तुरीचे भाव कमीच राहतात की काय आणि सध्याची परिस्थिती तशीच आहे.

कारण यंदा तुरीला सरकारने 7550 रुपये भाव जाहीर केला आणि बाजारामध्ये तुरीला 7000 ते 7300 रुपयांच्या दरम्यानच भाव मिळतोय. कमी गुणवत्तेची तूर यापेक्षा कमी दरात विकली जाते. आता पुढच्या काळात दोन-तीन आठवड्यानंतर बाजारामध्ये तुरीची आवक वाढणार आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही बाजारांमध्ये नवी तूर दाखल होते. आता सरकारने पहिला अंदाज 35 लाख टनांचा दिला आणि उत्पादन यंदाही कमीच राहणार आहे. याच्या नावाखाली सरकारने तूर आयातीला एक वर्षाची मुदत वाढ दिली म्हणजे पुढच्या एक वर्षभर देशात कोणत्याही शुल्काविना कोणत्याही कोट्याविना तूर आयात होणार आहे.

गेल्या वर्षीचा म्हणजे 2024 मधल्या आयातीचा आकडा पाहिला तर 2025 मध्ये देखील तुरीची आयात चांगली राहील, असं सांगितलं जातंय. परंतु आपण जर गेल्या वर्षीचा एकूणच अंदाज पाहिला म्हणजे गेल्या वर्षीचा उत्पादन आणि वापर पाहिला तर नव्या हंगामात म्हणजेच आता नव्या हंगामामध्ये तुरीचा शिल्लक स्टॉक खूपच कमी आहे. त्यामुळे साहजिकच तुरीला यंदा मागणी चांगली आहे. याचाच आधार सध्या बाजाराला दिसून येतोय म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होऊन देखील सध्या तुरीचा बाजार हमीभावापेक्षा मोठ्या प्रमाणात पडलेला नाही.

सध्या बाजारामध्ये ओलावा चांगला असलेला आणि चांगला गुणवत्ताच्या तुरीचा भाव 7000 ते ₹7300 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय आता जेव्हा तुरीची आवक वाढेल त्या काळामध्ये तुरीच्या बाजारावर आणखीन काहीसा दबाव वाढू शकतो सरासरी भाव आपल्याला ₹7000 दरम्यान देखील दिसू शकतो. काही वेळेला भाव म्हणजेच कमी गुणवत्ता असलेल्या तुरीचा भाव आपल्याला यापेक्षा देखील कमी दिसेल. परंतु शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग न करता सरकारला किमान विक्रीचं नियोजन करावं, सरकारने यंदा संपूर्ण तूर खरेदीचं आश्वासन दिलंय. सरकारनं देशाला कडधान्यामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी संपूर्ण तूर खरेदीचं ठरवलेलं आहे.

तूरीच भाव 9000 पर्यंत वाढू शकतात | Tur Market

त्यासाठी राज्यामध्ये नाव नोंदणीला सुरुवात झाली आहे. आता ज्या शेतकऱ्यांना पुढच्या महिन्या दीड महिन्यामध्ये तूर विकायची आहे. त्या शेतकऱ्यांनी किमान सरकारला हमीभावाने तूर घालावे म्हणजेच किमान शेतकऱ्यांना ₹7550 रुपये दर मिळेल आणि ज्या शेतकरी थांबू शकतात, त्या शेतकऱ्यांनी किमान बाजारातील आवक कमी होईपर्यंत थांबावं या परिस्थितीमध्ये तुरीचा बाजार सुरुवातीला आपल्याला हमीभावाच्या पुढे जाताना दिसेल, त्यानंतर बाजार ₹8000 टप्पा पार करून जेव्हा बाजारातील आवक कमी होईल, त्या परिस्थितीमध्ये बाजार 85 ते ₹9000 दरम्यान देखील पोचू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय, थोडक्यात काय तर यंदा तुरीची आवक वाढल्यानंतर भात खुल्या बाजारामध्ये दर जरी कमी झाले तरी शेतकऱ्यांना एक हमीभावाचा पर्याय असेल म्हणजेच जे शेतकरी थांबू शकत नाही. ते किमान हमीभावाने आपला विकू शकतात आणि शेतकऱ्यांनी किमान यंदा हमीभावाने तरी विकावा असं आव्हान अभ्यासकांनी केलाय हमीभावाने जर विकला तर शेतकऱ्यांना किमान ₹7550 रुपये हमीभाव मिळेल आणि जे शेतकरी थांबू शकतात.

त्यांनी दरवाढीच्या अपेक्षा यंदा थांबायला हरकत नाही. परंतु बाजारामधल्या परिस्थितीकडे घरामुलींकडे लक्ष ठेवून असावं तसंच बाजारामध्ये एकदा आपला अपेक्षित असा दर दिसला, तर शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्याने विकायला हरकत नाही.

परंतु बाजारामध्ये लक्ष ठेवून असावं बाजारामधल्या बदलत्या परिस्थितीचा देखील दरावरती परिणाम होऊ शकतो हे देखील लक्षात ठेवावं आणि त्यानुसार आपलं विक्रीचं नियोजन करावं असं आव्हान देखील अभ्यासकांनी केलंय आता एकूणच आपल्या जवळच्या बाजारांमध्ये सध्या तुरीला काय बाजार भाव मिळतो आपल्या भागामध्ये उत्पादन यंदा कसं आहे. गेल्या वर्षी पेक्षा उत्पादन वाढलं का तेवढंच आहे किंवा घटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

Polyhouse Subsidy : सर्व शेतकऱ्यांना 1 कोटी पर्यंत फळबागासाठी ८० लाख पर्यंत अनुदान

Kisan Credit Card Benefits : किसान क्रेडिट कार्ड चे फायदे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Categories NEW

७ वर्षांचा अनुभव असलेले कृषी क्षेत्रातील जाणकार. शेतीविषयी माहिती, तांत्रिक उपाय, सरकारी योजना, आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या बातम्या वेळेवर पुरवणारे, कृषी विषयक बातम्या, सरकारी योजना, पीक व्यवस्थापन, तंत्रज्ञान आधारित शेती उपाय. Follow the आपला बळीराजा channel on WhatsApp: https:// whatsapp.com /channel/0029 VaVXDW51dAw BKLGyfQ3F

Sharing Is Caring:

Leave a Comment